शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात कोरोना निर्बंधांना संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कडक निर्बंधाना मलकापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेमके काय करायचे या ...

मलकापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कडक निर्बंधाना मलकापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेमके काय करायचे या विवंचनेत सकाळपासूनच शहरात काही व्यावसायिक दुकानाचे शटर अर्ध्यावरच उघडून बसले होते; तर अनेकांच्या दुकानांचे शटर पूर्ण उघडे होते. मोजक्याच दुकानदारांनी शटर बंद ठेवले होते. त्यामुळे शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंदचा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यानुसार मलकापूर शहरातील काही व्यावसायिकांनी सकाळपासूनच अर्ध्यावर शटर ठेवून बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील काही व्यावसायिकांनी शटर डाऊन केले होते. मात्र, मलकापुरात कडक निर्बंधांना काही व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली; तर काही व्यवसायिकांनी शटर अर्ध्यावरच ठेवून आपले व्यवसाय सुरू ठेवल्याचे चित्र होते. महामार्गासह प्रमुख राज्यमार्गांवर काही प्रमाणात वाहतूक सुरू होती.

कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत व जखिणवाडी रस्त्यांवर अनेक ठिकाणी कोरोनाची भीती न बाळगता भाजी विक्रेत्यांनी मंडई थाटली होत; तर खरेदीदारही घोळका करून खरेदी करीत होते. त्यामुळे मिनी लॉकडाऊनला मलकापूर शहरासह महामार्गावर संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र होते.