शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषण कंपनीत साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST

कोपर्डे हवेली : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण कंपनीत वर्ग एक व वर्ग चार प्रवर्गातील आकृतीबंध ...

कोपर्डे हवेली : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण कंपनीत वर्ग एक व वर्ग चार प्रवर्गातील आकृतीबंध पदोन्नतीमध्ये तयार झालेला असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेच्यावतीने २००७पासून सतत पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला अखेर यश येऊन महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०१७मध्ये सुधारित आकृतीबंध लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, काही कारणांमुळे त्याला काहींनी विरोध केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेने मुंबई येथे आंदोलन केले. त्यावेळी ऊर्जा सचिव, कंपनीचे संचालक व संघटनेचे नेते यांच्यात बैठक होऊन एप्रिल महिन्यात सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. मे महिन्यात कंपनीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी तयार केलेल्या आकृतीबंधाला मान्यता दिली. मंगळवार, दि. १५ जून रोजी प्रशासकीय पत्रानुसार साडेचार हजार तंत्रज्ञान नेमणूक वर्ग चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत, महापारेषण कंपनीचे सुमीत गमरे, ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे सतत पाठपुरावा संघटनेचे अध्यक्ष काॅ. मोहन शर्मा, कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर, महेश जोतराव, भीमाशंकर पोहेकर आदींनी केला.

कोट

संघटनेच्या माध्यमातून भरतीसाठी सतत नेत्यांनी संबंधित विभागाकडे प्रयत्न केला, त्याचे हे यश आहे. लवकरच भरती सुरू होईल.

- नानासाहेब सोनवलकर