साताऱ्यात व्यापाऱ्यांला मारहाण करून चेन हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:44 IST2019-09-16T12:42:33+5:302019-09-16T12:44:52+5:30

दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणातून कापड व्यापारी नेमचंद हुकमत राजपाल (वय ७०, रा. कोटेश्वर मंदीराजवळ,सातारा) यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास देवी चौकात घडली. याप्ररणी शाहूपुरी पोलिसांनी मारहण व लुटमारीचा गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल केला आहे.

Chen beat the merchants by beating them at Satara | साताऱ्यात व्यापाऱ्यांला मारहाण करून चेन हिसकावली

साताऱ्यात व्यापाऱ्यांला मारहाण करून चेन हिसकावली

ठळक मुद्देसाताऱ्यात व्यापाऱ्यांला मारहाण करून चेन हिसकावलीशाहूपुरी पोलिसांत मारहण व लुटमारीचा गुन्हा दाखल

सातारा : दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणातून कापड व्यापारी नेमचंद हुकमत राजपाल (वय ७०, रा. कोटेश्वर मंदीराजवळ,सातारा) यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास देवी चौकात घडली. याप्ररणी शाहूपुरी पोलिसांनी मारहण व लुटमारीचा गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजपाल हे दि. १२ रोजी रात्री त्यांचे जावई दीपक केसवाणी यांच्या मालकीचे कापड दुकानात बसले होते. त्यावेळी साधारणपणे तीस ते चाळीस वयोगटातील एक व्यक्ती दुकानात आली. त्यांना दारू पिण्यास पैसे मागू लागली. राजपाल यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्या व्यक्तीने त्यांना मारहाण करुण त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली व पुढील तपासाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Chen beat the merchants by beating them at Satara