शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

चेक निघाले खोटे; भूमिपुत्राचे हेलपाटे!

By admin | Updated: July 25, 2014 22:14 IST

मोरणा भागातील प्रकार : पवनचक्की कंपन्यांकडून फसवणूक

अरुण पवार - पाटण शेतकऱ्यांच्या जमिनी काबीज करून त्यावर पवनचक्की टॉवर उभारणी केली. पवनचक्क्यांचे साहित्य नेणारी वाहने गुंडाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून नेण्यात आली. या बदल्यात नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना दिलेले लाखो रुपयांचे धनादेश तीन महिने होऊन गेले तरी वटले नाहीत. आता मात्र, पवनचक्क्यांचे प्रतिनिधी आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार सारख्या राज्यात जाऊन बसले आहेत. फसवणूक झालेला शेतकरी मात्र पवनचक्क्यांची ओसाड पडलेली कऱ्हाड, पाटण येथील कार्यालयांमध्ये चकरा मारतोय. पोलिसांकडे देखील जातोय. गोकुळ तर्फ पाटण व काहीर गावांच्या शेतकऱ्यांना अशा संकटांचा सामना करावा लागतोय. चेक वटला नाही म्हणून पोलिसांकडे गेले असता आधीच अशा तक्रार आमच्याकडे आल्या आहेत. त्यातच पवनचक्क्यांचे प्रतिनिधी बाहेरच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यांना कुठे शोधायचे अशी उत्तरे मिळतात. मात्र, हेच खाकी वर्दीवाले पवनचक्की कंपन्यांची वाहने सुरक्षित डोंगरावर पोहोचविण्यासाठी त्यांच्याच गाडीत बसून संरक्षण देताना मोरणा परिसरातील अनेकांनी पाहिले आहे. मग बोगस धनादेश दिला म्हणून पवनचक्की कंपन्यांच्या संबंधित प्रतिनिधीवर कारवाई का होत नाही ? असा सवाल विचारला जात आहे. पवनचक्की प्रतिनिधींचे फोन बंद वीजनिर्मिती करणारे पवनचक्क्यांचे पाती कोणत्या दिशेला फिरवायची, वाऱ्याची दिशा व वेग कसा आहे, या सर्वांचे नियंत्रण सातारा, पुणे यासारख्या ठिकाणी असणाऱ्या पवनचक्की कंपन्यांच्या कार्यालयातून होते. त्यामुळे कंपन्यांचे प्रतिनिधी डोंगर पठारावर येत नाहीत. आणि आले तर कधी येतात अन् पटकन निघून जातात, ते समजत नाही. मोबाईल बंद ठेवले जातात, अशी तक्रार शेतकरी करीत आहे. तुटपुंज्या पगाराची नोकरी पवनचक्क्यांचे टॉवर उभे राहिले ते शेतकऱ्यांच्या जमिनीतच. या टॉवरमधून आता वीजनिर्मिती सुरू झाली आहे. या टॉवरची देखभाल करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांची मुले वॉचमन म्हणून तुटपुंज्या पगारावर राबत आहे. तो पगारदेखील सहा महिने मिळाला नाही, अशी तक्रार ड्युटी करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.