साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल; बंद असलेले, पर्यायी मार्ग कोणते.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:14 IST2026-01-01T19:13:33+5:302026-01-01T19:14:23+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीतील बदलांची नाेंद घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले

साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल; बंद असलेले, पर्यायी मार्ग कोणते.. जाणून घ्या
सातारा : येथील शाहू स्टेडियमवर दि. १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहे. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीतील बदलांची नाेंद घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहेत.
दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२:०५ वाजल्यापासून ते दि. ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत हे बदल लागू आहेत. पोवई नाका, राधिका सिग्नल, एसटी स्टँड, शाहू स्टेडियम व भूविकास चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लादण्यात आले आहेत. तथापि, एसटी, शासकीय वाहने व रुग्णवाहिकांना नियमात सूट दिली आहे.
वाहतुकीस बंद असलेले मार्ग
- पोवई नाका व राधिका सिग्नल येथून बसस्थानक येथून भूविकास चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना भूविकास चौकातून पुन्हा बसस्थानकाकडे वळण्यास मनाई.
- मोळाचा ओढा, करंजे नाका येथून शाहू स्टेडियमसमोरून बसस्थानकाकडे जाण्यास मनाई.
- वाढे फाटा येथून भूविकास चौक मार्गे शाहू स्टेडियम व बसस्थानकाकडे जाण्यास मनाई.
- भूविकास चौकातून बसस्थानकाकडे जाण्यास मनाई.
पर्यायी मार्ग
- पोवई नाका, राधिका सिग्नल व बसस्थानकातून जाताना भूविकास चौकातून येणारी वाहने जुना आरटीओ चौक-पारंगे चौक-हजेरीमाळ मैदान मार्गे बसस्थानकाकडे जाता येईल.
- मोळाचा ओढा, करंजे नाका, वाढे फाटा येथून बसस्थानकाकडे येणारी वाहने जुन्या आरटीओ चौक, पारंगे चौक, हजेरी माळ मार्गे बसस्थानकाकडे जातील.
- पारंगे चौक ते बसस्थानक रस्ता एकेरी वाहतूक राहील.
वाहन पार्किंग व्यवस्था
- हजेरीमाळ मैदान - चारचाकी
- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (शाहू स्टेडियमसमोर) - दुचाकी
- कंग्राळकर असोसिएट (लँडमार्क) मोकळी जागा - दुचाकी व चारचाकी
- पोलिस परेड मैदानाजवळील रस्ता - दुचाकी
- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - दुचाकी व चारचाकी