शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांच्या अडचणीला केंद्र सरकार जबाबदार

By admin | Updated: January 13, 2015 00:18 IST

जयंत पाटील : निर्यात धोरणाअभावी एफआरपी अशक्य

सांगली : केंद्र सरकारने साखर निर्यात धोरण जाहीर न केल्यानेच एफआरपीची रक्कम देणे कारखान्यांना शक्य होत नाही. वास्तविक, यापूर्वीच केंद्र सरकारने साखर निर्यातीचा निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने सध्या तरी कारखानदारांपुढे निर्माण झालेल्या अडचणीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरिता आ. पाटील सांगलीत आले होते. चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगून आ. पाटील म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळले आहेत. साहजिकच उत्पादन खर्चापेक्षा साखरेच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळेच कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देणे अवघड झाले आहे. कोल्हापूर येथील काही कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर देण्याचे केवळ जाहीर केले आहे. केंद्र सरकारची आतापर्यंतची वाटचाल पाहता, त्यांचे धोरण शेतकरीहिताचे वाटत नाही. आॅक्टोबर महिन्यातच बदलती परिस्थिती पाहून साखर निर्यात करण्याची भूमिका सरकारने घेणे अपेक्षित होते. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने त्वरित निर्यात धोरण जाहीर करावे. आमच्या काळात अशीच परिस्थिती उद्भवली असता, कृषिमंत्री शरद पवार यांनी केवळ निर्यात धोरण जाहीर केल्याने साखरेचे दर १०० रुपयांनी वाढले होते.सध्याच्या सरकारमध्ये शरद पवारांसारखे शेतकरीहिताचे मंत्री नसल्यामुळेच निश्चित धोरण जाहीर करण्यास उशीर झाला असावा. एफआरपीचा प्रश्न सुटायचा असेल, तर साखरेचे दर वाढविणे हाच त्यावरील प्रमुख उपाय आहे, असेही आ. पाटील यांनी सांगितले.


‘स्वाभिमानी’वर बोलू  इच्छित नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत आ. पाटील म्हणाले की, वारंवार आंदोलने करून शेती प्रश्नावर संघटनेच्या नेत्यांचे ज्ञान वाढलेले आहे. शेतकरी हितासाठी संघटनेने सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्या विषयी मी अधिक काही बोलू इच्छित नाही.