शौचालयात महिलांचे चोरून चित्रीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST2021-01-14T04:32:21+5:302021-01-14T04:32:21+5:30

वाई : वाई एमआयडीसीतील एका खासगी कंपनीच्या शौचालयात लघुशंकेला जाणाऱ्या महिलांचे चोरून मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला ...

A case has been registered against the person who shot women in the toilet | शौचालयात महिलांचे चोरून चित्रीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

शौचालयात महिलांचे चोरून चित्रीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

वाई : वाई एमआयडीसीतील एका खासगी कंपनीच्या शौचालयात लघुशंकेला जाणाऱ्या महिलांचे चोरून मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष किसन पवार (रा. पेठकर कॉलनी, रविवार पेठ वाई) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, दि. १२ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाई एमआयडीसीतील एका कंपनीत महिलांच्या शौचालयाच्या भिंतीवर संशयिताने मोबाईल लाकडी पुठ्ठ्यावर ठेवून त्या पुठ्ठ्याला मोबाईल कॅमेऱ्यासमोर छिद्र पाडले व मोबाईलचा व्हिडिओ कॅमेरा सुरू ठेवला. याप्रकारे संशयित शौचालयात जाणाऱ्या महिलांचे लघुशंकेचे चोरून चित्रीकरण करत होता. ही बाब लघुशंका करण्यास गेलेल्या एका महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर तिने व्यवस्थापनाकडे तक्रार केली. यानंतर कंपनीने संतोष पवार याच्यावर वाई पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A case has been registered against the person who shot women in the toilet