Satara Accident: वाघोशी खिंडीत कार पन्नास फूट कालव्यात कोसळली; दोन ठार, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:41 IST2026-01-30T14:41:01+5:302026-01-30T14:41:16+5:30

कारमधील सर्व युवक आतच अडकले, त्यांना बाहेर पडता आले नाही.

Car falls into a fifty foot canal at Waghoshi Satara Two killed, three seriously injured | Satara Accident: वाघोशी खिंडीत कार पन्नास फूट कालव्यात कोसळली; दोन ठार, तिघे गंभीर जखमी

Satara Accident: वाघोशी खिंडीत कार पन्नास फूट कालव्यात कोसळली; दोन ठार, तिघे गंभीर जखमी

लोणंद (जि. सातारा) : शिरवळकडून लोणंदकडे येणारी कार वाघोशी खिंडीनजीक निरा-देवघर कालव्याच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या सुमारे ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

वनसिंग ऊर्फ जस्सी गोपाळसिंग रजपूत (वय २२, रा. लोणंद), रोहित बाळू टोपले (३३, मूळ रा. कुंडल, जि. सांगली. सध्या रा. लोणंद) अशी मृतांची नावे आहेत. तर चेतन सुनील शिंदे (२४, रा. कोऱ्हाळे, बिबी, ता. फलटण), रोहित सुखदेव भोई (२४, रा. इंदिरानगर, लोणंद) आणि दुर्गेश माधव धायगुडे (२२, रा. शेळके पाटील वस्ती, लोणंद) या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाघोशी खिंड परिसरात रस्ता अरुंद, वळणदार व अत्यंत खराब अवस्थेत असून, वाहनचालकांसाठी तो थेट मृत्यूचा सापळा ठरत आहे.

आतच अडकून राहिले

कालव्याच्या खोल खड्ड्यात कार कोसळल्यानंतर कारमधील सर्व युवक आतच अडकले, त्यांना बाहेर पडता आले नाही. क्रेनच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नानंतर कार खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गंभीर जखमींना तत्काळ लोणंद येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.

Web Title : सतारा: नहर में गिरी कार, दो की मौत, तीन गंभीर रूप से घायल

Web Summary : सतारा के पास, एक कार 50 फीट गहरी नहर में गिर गई, जिससे दो युवकों की मौत हो गई और तीन गंभीर रूप से घायल हो गए। वाघोषी खिंड के पास सड़क की खराब स्थिति के कारण दुर्घटना हुई। गहरी नहर के कारण बचाव प्रयासों में बाधा आई, वाहन को निकालने के लिए क्रेन की आवश्यकता पड़ी।

Web Title : Satara: Car Falls into Canal, Two Dead, Three Seriously Injured

Web Summary : Near Satara, a car plunged into a 50-foot canal, killing two young men and critically injuring three others. The accident occurred near Waghoshi Khind due to the road's poor condition. Rescue efforts were hampered by the deep canal, requiring a crane to extract the vehicle.