शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना आधी ‘कामगार’ म्हणा!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

साताऱ्यात निदर्शने : भारतीय मजदूर संघातर्फे घरकामगारांचा मोर्चा

सातारा : घरकामगारांना ‘कामगार’ म्हणून मान्यता मिळण्यासह विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सकाळी दहा वाजता राजवाडा येथून मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाभरातून सातशेहून अधिक घरकामगार मोर्चास आले होते. मोती चौक, शनिवार चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाकामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. घरकामगारांना ‘कामगार’ म्हणून मान्यता, तालुका व जिल्हास्तरावर नोंदणीची व्यवस्था, त्यासाठी पुरेसा वर्ग व कर्मचारी, घरकामगारांसाठी अंदाजपत्रकात तरतूद, त्यांना विविध योजनांचा लाभ, कामगार कल्याण मंडळावर व जिल्हा समितीवर भारतीय मजदूर संघाला प्रतिनिधीत्व, घरकामगारांच्या नोंदणीची वयोमर्यादा ७५ करणे, साठाव्या वर्षापासून दरमहा तीन हजार रुपये निवृत्तिवेतन, घरकामगारांच्या रद्द केलेल्या नोंदणीचे नूतनीकरण, मोफत घरे, अंत्योदय योजनेत प्राधान्य, अशा संघटनेच्या मागण्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकामगारांनी निदर्शने केली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रश्न तातडीने न सुटल्यास संघटना राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. मोर्चात तारका शाळीग्राम, विकास खाडे, शामराव गोळे, डी. जी. देशपांडे, रवी माने, प्रमिला वैले, संगीता नारकर यांच्यासह शेकडो महिलांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)