Satara: ग्रीसींग करताना डंपरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:30 IST2024-09-30T19:29:44+5:302024-09-30T19:30:48+5:30
मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रीसींग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी येथील ग्रीसींग व्यावसायिकाचा जागीच ...

Satara: ग्रीसींग करताना डंपरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिक ठार
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रीसींग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी येथील ग्रीसींग व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. दादासाहेब तुकाराम ढमाळ (वय ५०, रा.केसुर्डी ता.खंडाळा) असे मृत ग्रीसींग व्यावसायिक मालकाचे नाव आहे.
केसुर्डी ता.खंडाळा येथील दादासाहेब ढमाळ हे ट्रक, ट्रेलर आदी वाहनांचे मशिनच्या साहाय्याने ग्रीसींग करण्याचा व्यवसाय करीत होते. आज, सोमवारी ढमाळ हे असवली गावच्या हद्दीत एका खडी मशिनच्या डंपरला ग्रीसींग करीत असताना चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ढमाळ यांच्या मृत्यूची बातमी समजताच केसुर्डी ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची प्रकाश ढमाळ यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करीत घटना खंडाळा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली.