शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या एसटीमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:01 IST

महामार्गावरून भरधाव असलेल्या एसटीच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुभाजक तोडून एसटी विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी,ता. सातारा येथे झाला.

ठळक मुद्देधावत्या एसटीमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटकाखिंडवाडी येथील घटना : दोनजण गंभीर जखमी

सातारा/शेंद्रे : महामार्गावरून भरधाव असलेल्या एसटीच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुभाजक तोडून एसटी विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी,ता. सातारा येथे झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईहून कऱ्हाडकडे जाणारी एसटी बस (एमएच २० बीएल ३६६७) सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी परिसरात आली. यावेळी चालक विकास मारूती पवार (वय ३९, रा. तळमावले, ता. पाटण) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. एसटीचा वेग जास्त असल्यामुळे दुभाजक तोडून एसटी विरूध्द लेनवर गेली.

या लेनवरून येणाऱ्या दुचाकीला एसटीने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडीत धडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. बऱ्याच प्रवाशांच्या डोक्याला आणि हाता-पायाला जखम झाली.

एसटीतून प्रवासी खाली उतरल्यानंतर चालक विकास पवार हे स्टेअरिंगवरच बेशुद्ध असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रवासी व काही नागरिकांनी तत्काळ एसटी चालक पवार आणि जखमी प्रवासी अमित आत्माराम मोतमकर (वय ३२, रा. गजानन रेसिडेन्सी, फुटका तलाव सातारा) यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तर एसटीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दाम्पत्याला शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नावे पोलिसांना समजू शकली नाहीत. शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर