सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठत सोळा ठिकाणी घरफोड्या, दहातोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 18:21 IST2022-12-10T17:51:16+5:302022-12-10T18:21:13+5:30
घरफोड्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले

सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठत सोळा ठिकाणी घरफोड्या, दहातोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
मल्हारपेठ : मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीत सोळा ठिकाणी घरफोड्या सहा लाखांचा ऐवज लंपास झाला. या घरफोडीमुळे पाटण तालुका हादरला आहे.
पाटण तालुक्यातील सोनवडे, शिंदेवाडी, नवसरवाडीत एकाच रात्रीत सोळा घरफोड्या करुन चोरट्यांनी दहा तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकडसह पाच लाखाचा ऎवज लंपास केला आहे. मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आला.
गेल्या सहा महिन्यांपासून पाटण तालुक्यात सलग होणाऱ्या घरफोड्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी बंद घराना लक्ष केले असताना गुरुवारी रात्री मल्हारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दितील सोनवडे, शिंदेवाडी, हुंबरवाडी, चोपदारवाडी आणी कऱ्हाड-चिपळूण महामार्गालगत असणाऱ्या नवसरी येथील १६ ठिकाणी एकाच रात्री घरफोड्या केल्या.
यात १२ तोळे सोन्याच्या दागिण्यासह ९२ हजार ५०० रूपयांची रोकड चोरट्यानी लंपास केली. या घरफोडीमुळे पाटण तालुका हादरला आहे. पोलीस पाटील संदीप भोसले यांनी या घटनेची माहिती पोलिसात दिली होती. त्यानुसार घटनास्थळावर मल्हार पेठ पोलिसांनी पाहणी केली.