वाहनांचे मूळ स्मार्ट कार्डवरून बनवली बोगस कागदपत्रे; साताऱ्यात १९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 12:43 PM2024-02-06T12:43:16+5:302024-02-06T12:43:55+5:30

बनावट स्मार्ट कार्डचा वापर वाहनांवरील बोझा कमी करणे, पत्ते बदलणे तसेच वाहन हस्तांतरण करण्यासाठी केला

bogus documents made from original smart card of vehicles; Crime against 19 persons in Satara | वाहनांचे मूळ स्मार्ट कार्डवरून बनवली बोगस कागदपत्रे; साताऱ्यात १९ जणांवर गुन्हा

वाहनांचे मूळ स्मार्ट कार्डवरून बनवली बोगस कागदपत्रे; साताऱ्यात १९ जणांवर गुन्हा

सातारा : वाहनांचे मूळ आरसी स्मार्ट कार्ड अनधिकृतपणे आरटीओ कार्यालयातून घेऊन त्यावरील मूळ सर्व तपशील मिटवून बोगस कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी १९ जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

एजंट राहुल गुजर, अमर देशमुख, रमजान मुजावर, शीतल भागवत, किरण जाधव, रामकृष्ण वाळेकर, ओंकार पवार, दिनेश जाधव, अमृता राजपुरे, सागर गायकवाड, वैष्णवी जाधव, विजय काजळे, ओंकार जाधव, प्रवीण सोनमले, गंगाराम शेडगे, साहिल पिसाळ, हरुण सय्यद, संपत ठोंबरे, वाजीवअली शिकलगार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयितांनी आपापसात संगनमत करून मूळ वाहनांचे जमा असलेले नोंदणी प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयातून मिळवले. त्यावरून वाहनांच्या बनावट तयार केलेेल्या स्मार्ट कार्डचा वापर वाहनांवरील बोझा कमी करणे, पत्ते बदलणे तसेच वाहन हस्तांतरण करण्यासाठी केला. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक ए. डी. माने हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: bogus documents made from original smart card of vehicles; Crime against 19 persons in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.