शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात बाचल-बर्गेंचा जोर

By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST

ग्रामपंचायत निवडणूक : सातारारोडला काँग्रेसची सरशी

कोरेगाव : कोरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे किशोर बाचल आणि काँग्रेसचे किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडीने नऊ जागांवर विजय संपादन करीत सत्ता हस्तगत केली आहे. भैरवनाथ पॅनेलला सात जागा मिळाल्या असून, एका जागेवर अपक्ष विजय झाला आहे. त्यामुळे कोरेगावने पक्षविरहित राजकारणाची परंपरा यंदाही जपली आहे. कोरेगाव तहसील कार्यालयात गुरुवारी सकाळी दहा वाजता निवासी नायब तहसीलदार निवास ढाणे, महसूल नायब तहसीलदार रवींद्र रांजणे, श्रीरंग मदने व निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला. पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, विद्यमान उपसरपंच प्रतिभा बर्गे, अ‍ॅड. प्रभाकर बर्गे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलला सात जागा मिळाल्या आहेत. भैरवनाथ वॉर्ड क्र. ४ मधून अपक्ष उमेदवार राहुल रघुनाथ बर्गे हे विजयी झाले आहेत. सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिला संवर्गासाठी राखीव आहे. या जागेवर आघाडीच्या विद्या येवले विजयी झाल्या. १७ पैकी २ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले होते. विद्यमान तीन सदस्य पुन्हा एकदा ग्रामपंचायतीत प्रवेश करीत आहेत. जुनीपेठ वॉर्ड क्र. १ मधून सुमन बर्गे, अलका बर्गे व शांताबाई बर्गे यांनी माघार घेतल्याने नीता शंकरराव बर्गे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. हनुमान वॉर्ड क्र. ३ मधून मीना बर्गे यांनी माघार घेतल्याने मंदा किशोर बर्गे यांची बिनविरोध निवड झाली. या दोघी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या असल्याने आघाडीने विजयाचा श्रीगणेशा केला होता. मतदानावेळी किरकोळ वादाचे प्रकार घडल्याने मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. जुनीपेठ वॉर्ड क्र. १ मधून भैरवनाथ आघाडीने दोन्ही जागांवर विजय मिळविल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आझाद चौक वॉर्ड क्र. २ मध्ये भैरवनाथ पॅनेलने तिन्ही जागांवर विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयी घोषणा देण्यास सुरुवात केली. मतांची संख्या व एकूण आकडेवारीवरून आघाडी व पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. निवास ढाणे यांनी त्यांच्या शंकेचे निरसन केल्यानंतर पुढील मतमोजणीस सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक प्रकाश धस व सहायक पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)