मलकापुरात तरुणाचा खून

By Admin | Updated: August 13, 2015 22:59 IST2015-08-13T22:59:26+5:302015-08-13T22:59:26+5:30

पूर्ववैमनस्यातून हल्ला : थरारनाट्यामुळे नागरिकांत भीती

The blood of youth in Malkapur | मलकापुरात तरुणाचा खून

मलकापुरात तरुणाचा खून

मलकापूर : मलकापूर, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दूध डेअरीसमोर एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. संबंधिताला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अचानक झालेल्या या घटनेमुळे मलकापूरसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुरेश पांडुरंग जाधव (वय ३४, रा. काटपान मळा, कापील, ता. कऱ्हाड) असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जाधव हे पत्नी व मुलासह काटपान मळा येथे राहतात. (पान १ वरून) त्यांचा मुलगा सूरज हा पाचवीमध्ये शिकत असून, तो एका खासगी शिकवणीसाठी दररोज मलकापूर येथे येत असतो.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरेश जाधव हे मुलाला शिकवणीवरून घरी घेऊन जाण्यासाठी दुचाकीवरुन मलकापूर येथे पोहोचले. त्याला घेऊन जाण्यासाठी ते दुचाकीवर बसणार एवढ्यात झाडाच्या बाजूला दबा धरून बसलेल्या दोन व्यक्तींनी तेथे येऊन सुरेश जाधव यांच्यावर झडप घातली. त्याचबरोबर धारदार शस्त्राने सुरेश जाधव यांच्यावर दोन वार केले. ते वार जाधव यांच्या मानेवर व डोक्यावर वर्मी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
दरम्यान, शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक हणमंत काकंडकी, यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. पोलीस कर्मचारी व नागरिकांनी उपचारासाठी जाधव यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनेचा
पंचनामा केला. रात्री उशिरापर्र्यंत घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)--चिमुरड्यादेखत वडिलांचा खून
सुरेश जाधव यांचा मुलगा सागर मलकापूर येथे तो इंग्लिश स्पिकिंगचे धडे एका खासगी शिकवणीत घेतो. त्याला दररोज वडील घरी घेऊन जाण्यासाठी येतात. आजही वडील मुलाला घेऊन जाण्यासाठी आले खरे; पण चिमुरड्यादेखत वडिलांचा खून झाला आणि त्या दोघांची कायमची ताटातूट झाली. त्यावेळी चिमुरड्याने फोडलेला हंबरडा साऱ्यांचे हृदय हेलावून टाकत होता.


हल्लेखोरांना मुलाने ओळखले
वडिलांवर हल्ला करणारे ते दोन संशयित त्यांच्याच गावातील असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी जेव्हा मुलाकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने संबंधितांची नावे सांगितल्याचे समजते. त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The blood of youth in Malkapur