शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By admin | Updated: June 30, 2014 23:56 IST

‘लोकमत’चा उपक्रम : साताऱ्यात जिल्हा रुग्णालयात उद्या आयोजन

सातारा : ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह गेल्या वर्षीपासून संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहे. यावर्षीही बुधवार, दि. २ जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत सातारच्या जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रक्तदान हे महान पुण्यदान मानले जाते. रक्ताची गरज ही कोणत्याही व्यक्तीस केव्हाही लागू शकते. रक्त हे मानवी शरीरात तयार होते आणि त्याची गरज फक्त मानवालाच आहे. अडीअडचणीच्या वेळी माणुसकीच्या नात्याने रक्तदान करणारी व्यक्ती परमेश्वरच मानली गेली आहे. हे महत्त्व लक्षात घेऊनच हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांनी संपूर्ण जीवनभर लोककल्याण हे मूल्य केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या जयंतीनिमित्त याच मूल्यांची जपणूक करण्यासाठी ‘लोकमत’ परिवाराने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात जमा होणाऱ्या रक्तातून अनेकांच्या जीवनात संजीवनी मिळण्यास मदत होणार आहे. स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचा हा एक प्रयत्न आहे. यात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे आणि रक्तदानाचे पुण्य मिळवावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६२५२७१०२ आणि ९०११३९७७९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)