शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील माचीपेठ येथे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये स्फोट; एक ठार, दोन गंभीर जखमी

By दीपक शिंदे | Updated: October 2, 2024 14:24 IST

इमारतीच्या काचा फुटल्या; बॉम्ब स्कॉड, श्वान पथकाकडून तपासणी

सातारा : येथील माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट होऊन एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना आज, बुधवार, दि. २ रोजी दीडच्या सुमारास घडली. घटनास्थळी बॉम्ब स्कॉड व श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.मुनीर पालकर (वय ३५, रा. गुरुवार परज, सातारा), असे या भीषण स्फोटात ठार झालेल्या तर हारुण बागवान आणि उमर बागवान (रा. सातारा), अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या दोघांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.साताऱ्यातील अदालत वाड्याशेजारी माची पेठ आहे. या पेठेमध्ये रस्त्याला लागूनच सर्व्हिसिंग सेंटर आणि एक दुकान आहे. या दुकानामध्ये मुनीर पालकर आणि हारुण तसेच उमर हे तिघे बसले होते. त्यावेळी अचानक शाॅर्टसर्किट होऊन या दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, मुनीर पालकर हा तब्बल तीस फूट हवेत उडून डांबरी रस्त्यावर पडला. त्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. इतर दोघे दुकानाच्या शेजारीच रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण सातारा हादरून गेला. शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांना या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे जाणून घेण्यासाठी सातारकरांनीही घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. समर्थ मंदिरहून पोवई नाक्याकडे जाणारा रस्ता पोलिसांनी दोन्ही बाजूने बंद केला होता.प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे एकापाठोपाठ दोन स्फोटकाही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे, या ठिकाणी एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. हवेत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा धूर दिसत होता. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर