शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आठही मतदारसंघांत भाजपाची तयारी

By admin | Updated: August 22, 2014 22:06 IST

भाजपने २८८ जागांवर लढण्याची तयारी

कऱ्हाड : जागावाटपावरून महायुतीत सुसंवाद नसल्याच्या बातम्या येत असतानाच भाजपने २८८ जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे़ गुरुवारी पुणे येथे झालेल्या पक्षाच्या मंडल प्रमुखांच्या बैठकीत संघटनमंत्री व्ही़ सतीश यांनीही तसे संकेत दिल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आठही मतदारसंघांत भाजप तयारीला लागल्याचे दिसते़ भाजप, शिवसेना, आरपीआय़, स्वाभिमानी, रासप़, शिवसंग्राम अशी महायुती राज्यात लोकसभा निवडणुकीला आकाराला आली़ या महायुतीने चांगले यशही मिळविले़ त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती कायम राहील, अशी खात्री वाटते़ मात्र, गेल्या महिनाभरातील राजकीय घडामोडी पाहता, महायुतीत सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येत नाही़ निवडणुकीपूर्वीच भाजप-सेनेतील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ दोघांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा वादाला कारणीभूत मानल्या जातात. त्यातच खासदार राजू शेट्टीही ‘मनसेबरोबर युती करू,’ असा इशारा देताना दिसतात़ तसेच भाजप-सेनेच्या नेत्यांच्यात सुसंवाद नसल्याची जाहीर कबुलीही ते देतात, ही वस्तुस्थिती आहे़ २८८ जागांत वाटेकरी वाढल्याने दोन्ही प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे़ तर मोदी लाटेमुळे भाजप-सेनेच्या वाटेवर असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे़ या सगळ्यात नेत्यांना कसरत करताना दमछाक होत असल्याचे पुण्याच्या बैठकीत नेत्यांनी सांगितल्याचे समजते. याच वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १८ जागांची विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती निवडण्याचे संकेत दिले़ त्यामुळे भाजपने २८८ जागांची तयारी सुरू केल्याच्या वृत्ताला पुष्टीच मिळत आहे. (प्रतिनिधी)