शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: स्वबळावर लढण्याचा नारा देणा-या भाजपने यु-टर्न घेतला

By नितीन काळेल | Updated: January 22, 2026 19:36 IST

कोरेगावमध्ये भाजप-शिंदेसेनेबरोबर; फलटणध्ये राष्ट्रवादीसोबत युती

नितीन काळेलसातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. जिल्ह्यात स्वबळावर लढण्याचा नारा देणा-या भाजपने ऐनवेळी यु-टर्न घेतला. कोरेगावमध्ये शिंदेसेनेला तर फलटणमध्ये राष्ट्रवादीला काही जागा सोडल्याचेही समोर आले. तर जिल्हयात दोन्ही राष्ट्रवादीही अनेक ठिकाणी एकत्र असून काॅंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाही मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ तालुक्यांतील पंचायत समितीच्या १३० गणांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी बुधवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तसेच पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज सादर केले. या निवडणुकीत पूर्वीपासूनच भाजपचा स्वतंत्र बाणा दिसून आला. पण, शेवटच्या दिवशी काही ठिकाणी भाजपने यू टर्न घेतल्याचे समोर आले.

कोरेगाव, फलटणमध्ये तह...कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपने शिंदेसेनेसाठी काही गटात आणि गणांत उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे दोघांची युती झाल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. पण, या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत. फलटण तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आली. दोघांनी मिळून जागा वाटून घेतल्या आहेत. पण, येथे शिंदेसेना स्वतंत्रपणे लढत आहे.

सहा तालुक्यात भाजप स्वबळावर...माण तालुक्यात भाजप स्वतंत्र लढत आहे. याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे समोर आलेले आहे. खटाव तालुक्यातही भाजप स्वतंत्रपणे रिंगणात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असून काॅंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र उमेदवार उभे केलेत. खंडाळ्यात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र आहेत. पाटणला शिंदेसेना आणि भाजप हे दोघेही स्वतंत्र लढत आहेत. कराडमध्ये भाजप स्वतंत्र असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. सातारा तालुक्यात भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. जावळी तालुक्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षात वाटाघाटी झाल्याची माहिती समोर येत आहे.

काही जागांवर सोयीचे राजकारण....बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तरीही कोणता पक्ष किती ठिकाणी रिंगणात आहे, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. तसेच अनेक ठिकाणी सोयीचे राजकारणही झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून काही दिवस जाणार आहेत. तरीही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी आहे. त्यानंतरच कोणाची युती झाली, कोणी कोणासाठी किती जागा सोडल्या हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत फक्त चर्चाच सुरू राहतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: BJP U-Turn After Announcing Solo Fight

Web Summary : Satara BJP took a U-turn, forming alliances in Koregaon and Phaltan for ZP elections. Despite initial solo fight claims, strategic partnerships emerged with other parties across six talukas. The final picture will be clear after January 27.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार