शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पदाधिकाऱ्यांनी हातात घेतला झाडू...

By admin | Updated: November 14, 2014 23:17 IST

बसेस अडविल्या : स्वच्छतेची ग्वाही दिल्यानंतरच वाहतूक सुरू

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बसस्थानक आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी करत एसटी बसेस अडवून धरल्या. एका बाजूला एसटी बसेस रोखून धरल्या असतानाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाती झाडू घेत परिसराची स्वच्छता केली. दरम्यान, यावेळी एसटी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसर स्वच्छतेची ग्वाही दिल्यानंतर एसटी बसेस सोडून देण्यात आल्या.सातारा बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असून, येथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. बसस्थानकाशेजारून प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरून जाताना तोंडावर रुमाल ठेवूनच जावे लागते. त्यातचे बसस्थानकातून बाहेर पडणारे एक चेंबर येथेच उघडे असल्यामुळे दुर्गंधी अधिक असते. यामुळे ‘स्वच्छ भारत’ अभियान योजनेअंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत माजी आ. दिलीप येळगावकर, नगरसेविका सुवर्णा पाटील, सुहास पोरे, जयदीप ठुसे, सुजाता कोल्हटकर, निर्मला सांगलीकर, मंजू राजेशिर्के, पृथ्वीराज पाटील, आप्पा कोरे आदी सहभागी झाले होते.दरम्यान, अस्वच्छतेला एसटी प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी कऱ्हाड, सोलापूरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या. यामुळे काहीवेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. एसटी बसेस बराच वेळ थांबून राहिल्यामुळे येथे बांधकाम विभागाचे अभियंता आणि एसटीचे अधिकारी आले. त्यांनी येथील स्वच्छतेचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)