शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्हाध्यक्षांचे नावच मतदार यादीत नाही

By admin | Updated: April 7, 2015 01:12 IST

गृहनिर्माण मतदारसंघ : भरत पाटील यांना उमेदवारी दाखल करता आला नाही

कुडाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सत्तेवर आलेले भाजप-सेना देखील स्वतंत्र पॅनेल उभे करणार, अशी राजकीय चर्चा होती. मात्र, सोमवारी गृहनिर्माण पाणीपुरवठा गटातून उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांना मतदारयादीत नाव समाविष्ट नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षांच्या उमेदवारी अर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत पंचवार्षिक निवडणुकीत गृहनिर्माण-पाणीपुरवठा गटातून खासदार उदयनराजे भोसले व कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यात तुल्यबळ लढत झाली होती. तर यावेळी राज्यात सत्तेत आलेल्या भाजपने निवडणुकीची तयारी केली आहे. त्यादृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी सोमवारी गृहनिर्माण पाणीपुरवठा गटातून सातारा जिल्हा परिषद सेवकांची मालकी गृहनिर्माण सहकारी संस्था मलकापूर या सोसायटीतून जिल्हा बँकेला मतदार म्हणून वेळेत ठराव पाठविला होता. तर ही सोसायटी १९७७ पासून जिल्हा बँकेची सभासद असतानाही नेमके या सोसायटीचे मतदार यादीतून मतदार म्हणून नाव काढले गेल्याने अ‍ॅड. भरत पाटील यांना सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.अ‍ॅड. भरत पाटील यांच्याच उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भाजप-सेनेची जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नेमकी कोणती भूमिका राहणार? जिल्हाध्यक्ष आपल्या मतदान हक्कासाठी काय करणार? याचीही उत्सुकता राहणार आहे. ’ सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)मुदतीत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा ठराव पाठवूनही मतदार यादीत नाव समाविष्ट का नाही झाले. यासाठी गृहनिर्माण गटातील मतदार यादीची संपूर्ण चौकशी व्हावी व मला मतदानाचा अधिकार मिळावा. तसेच यासंदर्भात मी कायदेशीर मार्गाने जाणार आहे.- अ‍ॅड. भरत पाटील