शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये कलिंगड कापून साजरा होतोय वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

फलटण : केक कापून वाढदिवस साजरा करणे ही तशी पाश्चिमात्य संस्कृती. हल्ली ही संस्कृती आपल्याकडेही रुजू लागलीय. मात्र, फलटण ...

फलटण : केक कापून वाढदिवस साजरा करणे ही तशी पाश्चिमात्य संस्कृती. हल्ली ही संस्कृती आपल्याकडेही रुजू लागलीय. मात्र, फलटण तालुका आता याला अपवाद ठरू लागला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आता केकऐवजी कलिंगड कापून व भेट देऊन वाढदिवस साजरा केला जात आहे.

केक कापून वाढदिवस साजरा करणे ही पाश्चात्य संस्कृती आपण स्वीकारली आहे. त्यामुळे केकसह अन्य वस्तूंच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. आजची तरूणाई तर या संस्कृतीमध्ये पूर्ण वाहत गेली आहे. वाढदिवस घरी साजरा करण्याऐवजी आता हॉटेल, मोकळी मैदाने, पर्यटनस्थळी साजरा करण्याकडे कल वाढत चालला असून, पैशांची उधळपट्टीही मोठ्या प्रमाणात केली जाते. या सर्वांना बगल देत हंगामी फळांचा वापर करून वाढदिवस साजरा करण्याची नवी संस्कृती आता फलटण तालुक्यात रुजू पाहत आहे.

सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेली कलिंगडे बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढावी यासाठी फलटण तालुक्यात कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला जात आहे. आसू येथील नानासाहेब जाधव यांनी स्वत: आपला वाढदिवस कलिंगड कापून आणि इतरांना कलिंगड भेट देऊन साजरा केला. तसेच आपल्या प्रियजनांनादेखील कलिंगडे खाऊ घातली.

(कोट)

केक कापून वाढदिवस साजरा करणे, अवाढव्य खर्च करणे बरोबर नाही. त्यामुळेच मी कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळावा, त्याची मागणी वाढावी हाच या मागचा उद्देश आहे.

- नानासाहेब जाधव, आसू (फलटण)

फोटो : २१ फलटण ०१/०२

फलटण तालुक्यात कलिंगड कापून वाढदिवस साजरा करण्याची नवीन संस्कृती रुजू लागली आहे. नुकताच आसू येथील नानासाहेब जाधव यांनी कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला.