शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

विधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:35 IST

bjp, agriculturesector, prutwirajchavan, congress, sataranews भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देविधेयकाचा फायदा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना  : पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाडात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ

कऱ्हाड : भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड तालुक्यात विधेयकाविरोधात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगला गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ह्यशेतकरीविरोधी कृषी विधेयक मोदी सरकारने घाईघाईत आणले आहे. आपल्याला मिळालेल्या बहुमताचा शेतकरीविरोधी वापर मोदी सरकार करीत आहे. हे विधेयक शेतमालाची आधारभूत किंमत संपविणारे आहे.

यासाठीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या २ कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, शिवाजी मोहिते, हिंदुराव पाटील, प्रदीप जाधव, कऱ्हाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, इंद्रजित चव्हाण, संदीप रंगाटे, पंकज पिसाळ उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSatara areaसातारा परिसरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस