शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिजव पांडुरंगा तहानलेलं रान रे..!

By admin | Updated: June 30, 2014 00:31 IST

चांदोबाचा लिंब : लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रंगले पहिले रिंगण

सचिन गायकवाड ल्ल राहिद सय्यद /तरडगाव/लोणंदनको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे..।फक्त भिजव पांडुरंगाहे तहानलेलं रान रे..।अशी आर्त साद घालत चांदोबाचा लिंब येथे संत शिरोमणी ज्ञानोबा माउली पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज, रविवारी पार पडले. रिंगण पूर्ण झाल्यानंतर ज्या मार्गावरून माउलींचे अश्व गेले तेथे वारकरी नतमस्तक झाले आणि आपल्या हाताने ललाटी माती लावली.लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेला वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहे. लोणंद येथील मुक्कामानंतर सोहळा फलटण तालुक्यातील तरडगाव मुक्कामी निघाला आणि लोणंदकरांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. तीन वाजता सोहळा फलटण तालुक्यात आला आणि प्रत्येकाला चांदोबाचा लिंब येथे होणाऱ्या पहिल्या उभे रिंगणाची उत्सुकता लागली. लोणंद-तरडगाव मार्गावर लाखो वारकरी जमू लागले.बरोबर चार वाजता चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील माउलींचा रथ येऊन थांबला. चोपदारांनी सूचना करताच वारकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिले आणि हरिनामाचा गजर सुरू झाला. सर्वांत पुढे असलेले माउली आणि चोपदारांचे अश्व रथापुढे धावले. अश्व पुढे गेले आणि ते पुन्हा रथाच्या दिशेने मागे फिरले आणि लाखो वारकऱ्यांनी विठूरायाचा गजर सुरू केला. ज्या मार्गावरून माउलींचे अश्व गेले तेथे रस्त्याच्या दुतर्फा असलेले वारकरी नतमस्क झाले आणि ललाटी माती लावली.