उरूलमध्ये भीम-कुंती उत्सवाला अलोट गर्दी

By Admin | Updated: September 15, 2014 00:12 IST2014-09-14T20:35:50+5:302014-09-15T00:12:15+5:30

उत्साहात सांगता : भाद्रपद षष्ठीला भीमसेन मूर्तीचे विसर्जन

The Bhim-Kunti festival is all-round in Urul | उरूलमध्ये भीम-कुंती उत्सवाला अलोट गर्दी

उरूलमध्ये भीम-कुंती उत्सवाला अलोट गर्दी

मल्हारपेठ : उरूल, ता. कऱ्हाड येथे भीम-कुंतीमाता उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची रविवारी सांगता झाली़पाटण तालुक्यातील उरूल येथे दरवर्षी भीमसेन-कुंतीमाता उत्सव साजरा करण्यात येतो़ भाद्रपद महिन्यात पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा होतो़ गणेशोत्सवाबरोबर या उत्सवाची भाविकांकडून उपासना केली जाते़ गणेश विसर्जनानंतर भाद्रपद षष्ठीला भीमसेन मूर्तीचे विसर्जन केले जाते़ त्यानिमित्त गावात यात्रा भरवली जाते़ यावर्षीही हा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.रविवारी सकाळी आरती व विधिवत पूजा करून सजवलेल्या ट्रॅक्टरट्रॉलीमध्ये भीमसेन मूर्ती बसविण्यात आली़ त्यानंतर वाजतगाजत गावातून मिरवून काढण्यात काढली़ तसेच गावानजीक नदीच्या वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यात आले़
भीमसेन-कुंती मूर्ती विसर्जनानंतर भरवण्यात येणाऱ्या यात्रेत प्रतिवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. (वार्ताहर)

Web Title: The Bhim-Kunti festival is all-round in Urul