शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

मागण्या मान्य झाल्याने ‘हॉकर्स’ आंदोलन मागे

By admin | Updated: May 25, 2016 23:24 IST

कऱ्हाडमधील उपोषणास स्थगिती : संघटना पदाधिकारी, मुख्याधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा

कऱ्हाड : कऱ्हाड पालिका व हॉकर्स संघटना यांच्यामध्ये शहरात ‘अतिक्रमण झोन’ उभारण्याबाबत योग्य निर्णय होत नसल्याच्या कारणाने मंगळवारी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. संघटनेच्या मागण्यांचा विचार करता बुधवारी सकाळी अकरा वाजता पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने व मागण्या मान्य केल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणास स्थगिती दिली.बुधवारी सकाळी अकरा वाजता चारचाकी हातगाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, उपाध्यक्ष सतीश तावरे, तालुकाध्यक्ष जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर आदींनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेमध्ये संघटनेच्या मागण्या मान्य करत उपोषण मागे घेण्यास मुख्याधिकारी औंधकर यांनी सांगितल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.दरम्यान, उपोषणस्थळी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, शिवसेनेचे कऱ्हाड दक्षिण तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, रामभाऊ रैनाक, शेखर बर्गे, राहुल कुंभार, नितीन देसाई, हरिबा बल्लाळ, गजानन कुंभार आदींनी भेट दिली. व पाठिंबा दर्शविला. पालिकेचे अन्न भेसळ निरीक्षक रणजित पवार यांच्या उपस्थितीत उपोषणास स्थगिती देण्यात आली. यावेळी हातगाडाधारक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. अखेर उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत मुख्याधिकारी औंधकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहरातील चारचाकी हातगाडाधारकांवर पालिकेकडून कारवाई करण्यापूर्वी संघटनेला सांगण्यात यावे, हातगाडाधारकांकडून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा विषयांवर मुख्याधिकारी औंधकर व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. यावेळी मुख्याधिकारी औंधकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना मान्यता देत त्या अनुषंगाने सूचना केल्या. त्या पाळण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केले.संघटना पदाधिकारी व पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यात सकारात्मकपणे चर्चा पार पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी उपोषणास स्थगिती दिली. (प्रतिनिधी)कऱ्हाड येथील हॉकर्स झोनबाबत पालिकेसमोर सुरू केलेल्या उपोषणास संघटनेचे जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर यांनी बुधवारी स्थगिती दिली. यावेळी स्मिता हुलवान, शशिकांत हापसे आदी उपस्थित होते.