उसन्या पैशांवरून दाम्पत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST2021-02-27T04:52:35+5:302021-02-27T04:52:35+5:30

सातारा : तालुक्यातील कारंडवाडी येथे उसन्या पैशांवरून एका दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

Beating couple with borrowed money | उसन्या पैशांवरून दाम्पत्यास मारहाण

उसन्या पैशांवरून दाम्पत्यास मारहाण

सातारा : तालुक्यातील कारंडवाडी येथे उसन्या पैशांवरून एका दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विनायक जिजाबा कदम असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवार, दि. २४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल दशरथ साळुंखे (वय ३२, रा. कारंडवाडी) हे मजुरी करतात. त्यांनी विनायक जिजाबा कदम (रा. कारंडवाडी, ता. सातारा) याच्याकडून उसने पैसे घेतले होते. हे पैसे मागण्यासाठी विनायक हा अमोल यांच्या घरी गेला. घरी जाऊन पैसे मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी विनायक याने अमोल यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच पत्नीलाही मारहाण केली. हवालदार आय. एम. मुलाणी तपास करत आहेत.

Web Title: Beating couple with borrowed money