चायनीजचे बिल मागितल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST2021-03-04T05:12:04+5:302021-03-04T05:12:04+5:30

सातारा : चायनीजचे बिल मागितल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर ...

Beaten for asking for a Chinese bill | चायनीजचे बिल मागितल्याने मारहाण

चायनीजचे बिल मागितल्याने मारहाण

सातारा : चायनीजचे बिल मागितल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा नोंद झाला आहे. मारहाणीची हा प्रकार तालीम संघ मैदानावर घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी गौरव सचिन डांगे (वय २१, रा. गुरुवार पेठ, सातारा) याने तक्रार दिली आहे. गौरवचा चायनीजचा गाडा आहे. गौरव हा मित्राबरोबर दुचाकीवरुन निघाला होता. त्यावेळी काहीजणांनी त्याची गाडी अडविली. तसेच तुम्ही पैसे मागता काय? तुम्हाला दाखवतो, असे म्हणून त्यांना गाडीवरून खाली ओढून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. त्यानंतर दोघांना तालीम संघाच्या मैदानावर नेण्यात आले. त्या ठिकाणी गौरव आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आली. तसेच काचेच्या बाटलीने मारहाण करून जखमी करण्यात आले.

या मारहाणीच्या प्रकारानंतर गौरव डांगे याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी बासीद, मुन्ना शेख, हुजेब शेख व अन्य दोघे (पूर्ण नाव, पत्ता नाही. सर्व रा. टॅक्सी गल्ली, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार सणस अधिक तपास करीत आहेत.

................................................................

Web Title: Beaten for asking for a Chinese bill