शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांची ‘आरपार’ची लढाई!

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक : प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थांचे उरमोडीत जलसमर्पण

परळी : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील वेणेखोल ग्रामस्थ व इतर २३ गावे उरमोडी जलाशयात बाधीत आहेत. संपूर्ण बाधीत आहेत, त्यांना पुनर्वसन मिळाले आहे; मात्र जी अशंत: बाधीत आहेत, त्यांना अजून शासनाने लोंबकळत ठेवले आहे. बुधवारी, दि. ६ रोजी दुपारी तीन वाजता धरणग्रस्तांची जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याबरोबर बैठक आहे. या बैठकीत प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थ उरमोडी जलाशयात जलसमर्पण करणार आहेत. आता आरपारची लढाई सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वेणेखोल ग्रामस्थांनी, दि. ३० रोजी उरमोडी धरणाच्या भिंतीवर उपोषण केले होते. हे उपोेषण सुमारे पाच तास सुरू होते. मात्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उरमोडी धरण कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांनी तुमचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक लावून सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले होते. ती बैठक आता बुधवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. जर या बैठकीत पुनर्वसनाचा प्रश्न, ६५ टक्के रकमेचा प्रश्न मार्गी न लागल्यास सर्व वेणेखोल ग्रामस्थ तसेच सातारा तालुक्यातील पुनवडी, दहिवड, आगटडवाडी, वडगाव, पाटेघर, बनघर, कासारथळ, नित्रळ आदी गावांतील ग्रामस्थ उरमोडी जलाशात जलसमर्पण करणार आहेत.बुधवारी होणाऱ्या बैठकीत जर प्रशासनाने पुढील बैठकीचे आश्वासन दिले तरी आम्ही ते मानणार नाही. बुधवारच्या बैठकीतच आमच्या मागण्यांचा निर्णय झाला पाहिजे, अशा पवित्र्यात धरणग्रस्त आहेत. (वार्ताहर)प्रशासनाशी आजची शेवटची बैठक...गेली १८ वर्षे २ महिने प्रशासन आम्हास आश्वासने देत आहेत. मात्र बुधवारी जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची वेणेखोल ग्रामस्थांची शेवटची निर्णायक बैठक असेल. यापुढे आम्ही आश्वासने स्वीकारणार नाही. आमचा पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत मार्गी लागलाच पाहिजे; अन्यथा उरमोडीत जलसमर्पण आणि जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही सुमारे चारशे ग्रामस्थांनी दिला आहे.अनेक वर्षे आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला होता. मात्र, प्रशासन आम्हास फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीत चर्चा करणार असून, ती बैठक ही आमची त्यांच्याशी शेवटची असणार आहे. यापुढे आम्ही आमच्यापरीने प्रश्न सोडवू. बैठकीत निर्णय न झाल्यास उरमोडीत जलसमर्पण करणार असून, आम्ही ग्रामस्थांनी आरपारची भूमिका घेतली आहे.-विठ्ठल सपकाळ, सदस्य-वेणेखोल धरणग्रस्त समिती