शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

बेबीतार्इंचं ‘जीणं आमुचं’ अमेरिकेच्या विद्यापीठात

By admin | Updated: April 18, 2015 00:07 IST

साहित्यिका : अनुवादित पुस्तक अभ्यासक्रमात

फलटण : फलटण येथील ज्येष्ठ दलित साहित्यिका दिवंगत बेबीताई कांबळे यांच्या ‘जीणं आमुचं’ या आत्मचरित्रपर मराठी पुस्तकाचे ‘दि प्रिझन्स वुई ब्रोक’ (आम्ही तोडलेले तुरुंग) नावाने इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकाचा अमेरिकेच्या विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. बेबीतार्इंच्या दलित साहित्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवरून होऊ लागला आहे. फलटणच्या अल्पशिक्षित, दलित महिलेचे आत्मचरित्र आता अमेरिका विद्यापीठात शिकवले जाणार असल्याने त्यांच्या साहित्याचा जागतिक पातळीवर गौरव होत असल्याचे मानले जात आहे.जगातील अनेक विद्यापीठांनी दलित साहित्य अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न केला आहे. वॉशिंग्टन, टेक्सास, आॅटेगॉन या विद्यापीठांनी दलित आत्मचरित्र अभ्यासक्रमात आणले आहेत. सध्या न्यूयॉर्कने इस्थेटिक्स (सौंदर्यशास्त्र), पॉलिटिक्स (राज्यशास्त्र) कोर्स सुरू केला आहे. या कोर्समध्ये इंग्रजीत अनुवादित झालेली जुथान (ओमप्रकाश वाल्मिकी), अन्टचेबल्स (डॉ. नरेंद्र जाधव), दि प्रिझन्स वुई ब्रोक (बेबीताई कांबळे) आदी इंग्रजी अनुवादित आत्मचरित्रपर पुस्तके सर्वात लोकप्रिय झाली आहेत. कांबळे यांच्या पुस्तकांवर दोघांनी डॉक्टरेट केली आहे. (प्रतिनिधी) विचार दूरवर...सातवी शिक्षण झालेल्या महिलेने दुकानातील वर्तमानपत्रांची रद्दी वाचून लिखित पुस्तकांना आकार दिला. हीच पुस्तके (आत्मचरित्र) साता समुद्रापलीकडे आज गेली आहेत. अल्पशिक्षित महिलाचे सामाजिक विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याने त्यांच्या साहित्य व विचारांचा गौरव हीच खरी बेबीतार्इंना श्रद्धांजली ठरत असल्याचे साहित्यक्षेत्रात मानले जात आहे.