शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाने ठोकरल्याने औंधची शिक्षिका ठार

By admin | Updated: November 6, 2015 23:37 IST

वडूज-गोपूज रस्त्यावर अपघात : शाळेला जाताना काळाचा घाला

वडूज : येथील प्राथमिक शिक्षिका सुरेखा विलास मोरे-खराडे या दुचाकीवरून शाळेला येत असताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. औंध येथील राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य विलास मोरे यांच्या त्या पत्नी होत. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा मोरे-खराडे (वय ४७ मूळगाव चरेगाव, ता. कऱ्हाड) या वडूज येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्या दररोज औंध ते वडूज हा प्रवास दुचाकीवरून करत होत्या. शुक्रवारी सकाळी साडेनऊला नेहमीप्रमाणे त्या वडूजला येण्यासाठी निघाल्या. गोपूजमार्गे जात असताना भावलिंग मंदिराजवळच्या रस्त्यावर त्या आल्या असताना त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने ठोकरले, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी उपप्राचार्य विलास मोरे यांना याची माहिती दिली. त्यानंतर सुरेखा मोरे यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी) सुटीच्या एका दिवसापूर्वीच मृत्यू... सुरेखा मोरे यांनी १९८६ मध्ये कोयनानगर येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून प्रारंभ केला. त्यानंतर त्या अनेक वर्षे खटाव तालुक्यातील औंध, त्रिमली, जायगाव, वडूज येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शाळांना शनिवार, दि. ७ पासून दिवाळीची सुटी लागणार होती. मात्र, सुटी लागण्याच्या एक दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.