औंध पोलिसांनी गुटख्याची चोरटी वाहतूक पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:30+5:302021-01-08T06:08:30+5:30

औंध : औंध पोलिसांची टीम पुसेसावळी भागात पेट्रोलिंग करीत असताना चोराडे-विटा रोडने गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ...

Aundh police nabbed smugglers of gutkha | औंध पोलिसांनी गुटख्याची चोरटी वाहतूक पकडली

औंध पोलिसांनी गुटख्याची चोरटी वाहतूक पकडली

औंध : औंध पोलिसांची टीम पुसेसावळी भागात पेट्रोलिंग करीत असताना चोराडे-विटा रोडने गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचत वडगाव-चोराडे रस्त्यावर पाठलाग करून चारचाकी गाडी पकडली. यामध्ये सुमारे १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्वप्नील सुरेश शेंडके (वय २१) व आकाश विजय पवार (२२, रा. दोघे शिवनाकवाडी, ता. शिराळा, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, औंध पोलिसांची टीम पुसेसावळी भागात पेट्रोलिंग करीत असताना चोराडे-विटा रोडने गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर औंधचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस नाईक संतोष कोळी, प्रशांत पाटील, भीमराव वळकुंद्रे, सागर पोळ, चंद्रकांत शिंदे, होमगार्ड धनंजय महामुनी, संजय ननवरे यांच्या पथकाने कारला (एमएच ०८ झेड २४७१) वडगाव-चोराडे रस्त्यावर पाठलाग करून पकडले. गाडीची तपासणी केली असता मागील बाजूस ७५ पोती व चार बाॅक्स गुटखा बेकायदेशीरपणे ठेवल्याचे आढळून आले. औंध पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

गुटखा पकडल्याबाबत अन्न व औषध प्रशासनला कळविल्यानंतर ए. जी. गायकवाड व एम. एस. हवालदार यांनी मुद्देमाल तपासला असता, यामध्ये ६ लाख ३४ हजार किमतीचा गुटखा व सहा लाख रुपये किमतीची चारचाकी असा एकूण १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी औंध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम भापकर व पोलीस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

०७औंध दारू?????

फोटो : औंध पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, संतोष कोळी, प्रशांत पाटील, भीमराव वळकुंद्रे, सागर पोळ, दाजी जाधव उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)

Web Title: Aundh police nabbed smugglers of gutkha