Satara: अतुल भोसलेंनी विधानसभेतील पहिले मानधन दिले बालसुधारगृहाला
By प्रमोद सुकरे | Updated: April 12, 2025 17:36 IST2025-04-12T17:35:42+5:302025-04-12T17:36:15+5:30
कऱ्हाड: कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी कराड येथील दिवंगत क्रांतिवीर माधवराव जाधव बालसुधारगृहाला सदिच्छा भेट ...

Satara: अतुल भोसलेंनी विधानसभेतील पहिले मानधन दिले बालसुधारगृहाला
कऱ्हाड: कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी कराड येथील दिवंगत क्रांतिवीर माधवराव जाधव बालसुधारगृहाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बालसुधारगृहाची सध्याची परिस्थिती, त्यांच्या गरजा या सगळ्यांची माहिती व्यवस्थापन व संचालक मंडळाकडून घेतली.
यावेळी त्यांनी अडचणी सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिलेच पण विधानसभा सदस्य झाल्यानंतर मिळालेले पहिले मानधन व इतर मिळून ३ लाखाचा धनादेश बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केला. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह उद्योजक मोहन पाटील, गंगाधर जाधव,माजी नगरसेवक राजेंद्र यादव, प्रशांत चांदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कराड येथे गेल्या ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेले बालसुधारगृह आहे. आजवर या बालसुधारगृहातून ६ हजारावर मुले सांभाळी गेली आहेत. आज ती वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. अनाथ, एकल मुलांना हे बालसुधारगृह वरदायी ठरले आहे. बालसुधारगृहातील व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून या संस्थेचे रुप पालटले आहे.चांगल्या व्यवस्थापनाबाबत या बालसुधारगृहाला नुकताच राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठवलेले आहे. मला मिळालेले पहिले मानधन एखाद्या चांगल्या संस्थेला द्यावा अशी माझी मनीषा होती. म्हणूनच ते कराड येथील बालसुधारगृहाला दिले. - डॉ.अतुल भोसलेआमदार, कराड दक्षिण