Satara Crime: प्रेमात अडकवून खंडणी उकळणारी टोळी गजाआड, महिलेसह १० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:24 IST2026-02-21T15:22:24+5:302026-02-21T15:24:32+5:30

एका हॉटेल व्यावसायिकाकडून ४० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न

Attempt to extort Rs 40 lakh from a hotelier by luring him with love, Phaltan city police arrest 10 people including a woman | Satara Crime: प्रेमात अडकवून खंडणी उकळणारी टोळी गजाआड, महिलेसह १० जणांना अटक

संग्रहित छाया

फलटण (जि. सातारा) : प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून एका हॉटेल व्यावसायिकाला जाळ्यात ओढत त्याच्याकडून ४० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात झाला होता. या प्रकरणात साखळी टोळीचा पर्दाफाश करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. एका महिलेसह इतर संशयितांना अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

साहिल रवि तारे (रा. दत्तनगर, फलटण), वैभव बाळासाहेब सस्ते (रा. सस्तेवाडी, ता. फलटण), रोहन नवीन काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण), विनायक बाळासाहेब जाधव (रा. ठाकूरकी, ता. फलटण), राज राम बोके (रा. मंगळवार पेठ, फलटण), विजय दत्तू ननवरे (रा. झिरपे गल्ली, फलटण), तुषार ऊर्फ गदया संजय ननवरे (रा. झिरपे गल्ली, फलटण), सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे), राहुल रामचंद्र जगताप (रा. कसबा पेठ, फलटण) एक महिला आरोपी, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

एका हॉटेल व्यावसायिकाला अश्लील बोलून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण केली होती. त्यानंतर ४० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यापैकी काही रक्कम रोख, तसेच एटीएम आणि इतर माध्यमांतून उकळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपींकडून २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाइल जप्त केला आहे. अटक केलेल्या सर्वांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Attempt to extort Rs 40 lakh from a hotelier by luring him with love, Phaltan city police arrest 10 people including a woman