शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हे तर कृत्रिम भूकंपाचे धक्केच...

By admin | Updated: September 18, 2014 23:25 IST

‘लो फ्रिक्वेन्सी’ धमाका : उत्सवात वापरली जाते ती ‘डॉल्बी’ नव्हेच

राजीव मुळ्ये - सातारा  -‘लो फ्रिक्वेन्सी’ ध्वनिलहरींचा अतिरेक करून नाचण्याची ऊर्मी निर्माण करणारी ध्वनियंत्रणा ही खरीखुरी ‘डॉल्बी’ नव्हेच! ध्वनिलहरी कंपनांच्या स्वरूपात बाहेर फेकल्या जात असल्यामुळे रक्त उसळतं खरं; परंतु हा एक प्रकारचा ‘कृत्रिम भूकंप’च असतो. -ध्वनिलहरींची तीव्रता (फ्रिक्वेन्सी) ‘हर्टझ’ या एककात मोजली जाते. कमी तीव्रतेच्या आणि अधिक तीव्रतेच्या लहरी सहन करण्याची कानांची मर्यादा ठरलेली आहे. माणसाचा कान २० हर्टझ इतक्या क्षमतेच्या ‘लो फ्रिक्वेन्सी’ तर २० किलोहर्टझ म्हणजे २० हजार हर्टझ इतक्या ‘हाय फ्रिक्वेन्सी’ लहरी सहन करू शकतो. गणेशोत्सवात किंवा वरातीत लावल्या जाणाऱ्या आणि सध्या ‘डॉल्बी’, ‘डीजे’ नावांनी लोकप्रिय असणाऱ्या ध्वनियंत्रणेत स्पिकर्सची संख्या भरपूर असते. बॉक्समध्ये बसविलेला स्पिकर पडद्यावर ध्वनिलहरी सोडतो आणि पडदा कंप पावतो. कंपनामुळे बॉक्समधील हवा हलते आणि पडद्याला असलेल्या छिद्रांमधून बाहेर फेकली जाते. नाचण्यासाठी आवश्यक असतो ठेका म्हणजेच ‘बीट्स’. ‘बीट्स’ निर्माण करण्याचे काम ‘लो फ्रिक्वेन्सी’ तालवाद्यांचे (उदा. डग्गा, ढोल, तुंबा) असते. ‘फ्रिक्वेन्सी’ नियमित करणाऱ्या यंत्रणेला ‘इक्विलाइझर’ म्हणतात. ठेक्यावर लक्ष केंद्रित व्हावे, म्हणून या ‘इक्विलायझर’च्या साह्याने ‘हाय फ्रिक्वेन्सी’चे आवाज (उदा. घुंगरू, टाळ, झांज) कमी करून ‘लो फ्रिक्वेन्सी’चा आवाज वाढविला जातो. परिणामी संगीतातील ‘स्पष्टता’ कमी होऊन धक्के बसल्यासारखे ‘बीट््स’ स्पिकरमधून बाहेर पडत राहतात. त्यातून निर्माण होणाऱ्या लहरींमुळे जवळ उभ्या राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातही कंपने निर्माण होतात आणि तो नाचण्यास प्रवृत्त होतो. या लहरींची तुलना भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या लहरींंशीच होऊ शकते. वयस्क, लहान मुले, हृदयविकारग्रस्त आणि गर्भवती महिलांना त्या सहन होत नाहीत. उत्सवात ध्वनियंत्रणांच्या ‘डेसिबल’ची मर्यादा ठरवून दिलेली आहे. तथापि, मिरवणुकीत एकाच वेळी अनेक ध्वनियंत्रणा एकाच परिसरात दणाणत असतात. अशा वेळी तयार होणाऱ्या कंपनांची बेरीज करता, मर्यादेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त ध्वनी निर्माण होतो, असे ध्वनिमुद्रण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. दणदणाटामुळे नामकरणचित्रपटगृहातील ‘डॉल्बी’ची तुलना अनेकदा रस्त्यावर वाजणाऱ्या ध्वनियंत्रणेशी केली जाते. तथापि, ‘डॉल्बी’ या अमेरिकेतील कंपनीची अधिकृत ध्वनियंत्रणा चित्रपटगृहांत असते आणि प्रत्येक ‘फ्रिक्वेन्सी’चा आवाज ठरलेला असतो. कंपनीने थिएटरसाठी ‘डिकोडर’ दिलेले असतात आणि प्रत्येक थिएटरला ‘प्रोसेसर’ही दिले जातात. केवळ दणादणा आवाज येतो म्हणून उत्सवातील ध्वनियंत्रणेला ‘डॉल्बी’ म्हणण्याची प्रथा पडली आहे.