Satara: वाठार येथील पेट्रोलपंपांवर सशस्त्र दरोडा, हल्ल्यात कर्मचारी जखमी; सव्वालाखाची रोकड लांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:32 IST2025-03-12T16:32:19+5:302025-03-12T16:32:37+5:30

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड तालुक्यातील वाठार हद्दीतील गणेश पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री एक वाजता सशस्त्र दरोडा पडला. पेट्रोलपंपामध्ये ...

Armed robbery at a petrol pump in Wathar area of ​​Karad taluka on the Pune-Bangalore National Highway employee injured in attack | Satara: वाठार येथील पेट्रोलपंपांवर सशस्त्र दरोडा, हल्ल्यात कर्मचारी जखमी; सव्वालाखाची रोकड लांबवली

Satara: वाठार येथील पेट्रोलपंपांवर सशस्त्र दरोडा, हल्ल्यात कर्मचारी जखमी; सव्वालाखाची रोकड लांबवली

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड तालुक्यातील वाठार हद्दीतील गणेश पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री एक वाजता सशस्त्र दरोडा पडला. पेट्रोलपंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोर युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. त्यांनी कर्मचाऱ्याजवळील सुमारे सव्वालाखांची रोकड हिसकावून तेथून पोबारा केला.

दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्रोलपंपावरील परशुराम सिद्धार्थ दुपटे हा कर्मचारी जखमी झाला आहे. महामार्गालगत असलेल्या पेट्रोलपंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. वाठार हद्दीत महामार्गालगत ऋषिकेश पांडुरंग गावडे यांच्या मालकीचा गणेश पेट्रोलपंप आहे. या पंपावर सोमवार, दि. १० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कर्मचारी परशुराम दुपटे येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत होते.

रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून दोन युवक पेट्रोलपंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी दुपटे यांच्याकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घेतले. त्याचवेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने दुपटे यांना पेट्रोलचे पैसे दिले. ते पैसे घेऊन दुपटेे आपल्याजवळील बॅगमध्ये ठेवत असतानाच पाठीमागील युवकाने त्याच्या शर्टातून आणलेला कोयता काढून दुपटे यांच्या अंगावर, पायावर आणि हातावर सपासप वार केले. ते वार चुकवत दुपटे यांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी दरोडेखोरांनी दुपटे यांच्या हातातील बॅग हिसकावून घेत दुचाकीवरून तेथून पोबारा केला. त्या बॅगमधील १ लाख २० हजार ९३५ रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले.

घटना घडल्यानंतर याबाबत पेट्रोलपंपाचे मॅनेजर नीलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मॅनेजर तावरे यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पेट्रोलपंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: Armed robbery at a petrol pump in Wathar area of ​​Karad taluka on the Pune-Bangalore National Highway employee injured in attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.