कर्तृत्व दाखविणाऱ्यांवर कौतुकाची थाप गरजेची : भावके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:53 IST2021-02-26T04:53:43+5:302021-02-26T04:53:43+5:30

घोगाव (ता. कऱ्हाड) येथे ओम शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड नर्सिंग सायन्समध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित ...

Applause is needed on those who show accomplishment: Bhavke | कर्तृत्व दाखविणाऱ्यांवर कौतुकाची थाप गरजेची : भावके

कर्तृत्व दाखविणाऱ्यांवर कौतुकाची थाप गरजेची : भावके

घोगाव (ता. कऱ्हाड) येथे ओम शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड नर्सिंग सायन्समध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भावके बोलत होते.

भावके म्हणाले, समाजात आज चांगले काम करणारे कमी दिसतात. अशावेळी चांगले काम करणाऱ्यांची दखल घेतल्यावर त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळू शकते.

यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, धनाजी काटकर, भीमराव धुळप, अमित चव्हाण, शरद गाडे, संभाजीराव थोरात, सलिमा इनामदार, संजय पाटील या मान्यवरांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘शिवशाही रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या आशा जकनूर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ता सोळंकुरे, अश्विनी भोपते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो : २५प्रमोद०१

कॅप्शन : घोगाव (ता. कऱ्हाड) येथे शिवशाही रत्न पुरस्काराचे वितरण करताना संजय भावके.

Web Title: Applause is needed on those who show accomplishment: Bhavke