शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक : शिवेंद्रसिंहराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

सातारा : ‘शिक्षणाबरोबरच विविध क्रीडाप्रकारांत पारंगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात करियरच्या चांगल्या संधी आहेत. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीत सातत्य आवश्यक आहे. ...

सातारा : ‘शिक्षणाबरोबरच विविध क्रीडाप्रकारांत पारंगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात करियरच्या चांगल्या संधी आहेत. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीत सातत्य आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक आहे,‘असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूह आणि निरंजन कदम मित्रसमूहाच्या वतीने गुणवंत खेळाडू गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘विविध क्रीडाप्रकारांत अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तसेच खेळाडूंनीही कष्ट, जिद्द आणि चिकाटी वृत्ती अंगीकारून सरावामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. तरच खेळाडू यशाचे शिखर गाठेल. निरंजन कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

या सोहळ्यात मधुरा ननावरे (कुस्ती), मृदुला पुरीगोसावी (जलतरण), आरव मोरे (मल्लखांब), आयुष मोकाशी (बॉक्सिंग), साईराज काटे (नेमबाजी), उमेश चव्हाण (शरीरसौष्ठव) आदी गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाचे अध्यक्ष फिरोज पठाण, उपाध्यक्ष निरंजन कदम, विलासपूरचे उपसरपंच अभय जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, सचिन पाटील, जितेंद्र कदम, रोहन घोरपडे, धीरज डिसले, शंकर भोसले, ऋषिकेश जांभळे आदी उपस्थित होते.

फोटो ०३सातारा सुरूची नावाने...

फोटो ओळ : सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी निरंजन कदम उपस्थित होते.

\\\\\\\\\\\\\\\\\\\