फलोत्पादन योजनेसाठी शेतकऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:24+5:302021-01-08T06:06:24+5:30

सातारा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत लाभासाठी शेतकऱ्यांनी १० जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत कृषी ...

Appeal to farmers for horticulture scheme | फलोत्पादन योजनेसाठी शेतकऱ्यांना आवाहन

फलोत्पादन योजनेसाठी शेतकऱ्यांना आवाहन

सातारा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत लाभासाठी शेतकऱ्यांनी १० जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत कृषी विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, हरितगृह, शेडनेट हाऊस, मल्चिंग, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण, काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रेफर व्हॅन, कोल्ड स्टोरेज, फ्री कुलिंग युनिट, एकात्मिक शितसाखळी प्रकल्प, फिरते विक्री केंद्र, कांदाचाळ व मनुष्यबळ विकास अशा अनेक बाबींसाठी लाभ देण्यात येतो.

या सर्व बाबींसाठी इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी १० जानेवारीपर्यंत शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.

00000

Web Title: Appeal to farmers for horticulture scheme