शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकाच खऱ्या कोरोना योद्धा : कोळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

आदर्की : ‘अंगणवाडी सेविका, मदतनीस या देशाच्या भावी पिढीला घडविण्याचे काम करत आहेत. कोरोना काळात सर्वजण घरात असताना अंगणवाडी ...

आदर्की : ‘अंगणवाडी सेविका, मदतनीस या देशाच्या भावी पिढीला घडविण्याचे काम करत आहेत. कोरोना काळात सर्वजण घरात असताना अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जावून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्याच खऱ्या कोरोना योद्धा आहेत,’ असे गौरवोद्गार फलटण पंचायत समिती सदस्या लताताई कोळेकर यांनी काढले.

मुळीकवाडी (रामोशी वस्ती) येथे तरडगाव बीट अंतर्गत पोषण आहार पंधरवडा व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी डिजिटल साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुळीकवाडीचे उपसरपंच गणेश कदम, ग्रामपंचायत सदस्य लहुराज मोहिते, माजी सरपंच सुनील जाधव, शिक्षण व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष हणमंत जाधव, शिक्षक बँकेचे संचालक अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सोनाली जाधव, उषाताई कदम, पर्यवेक्षिका दीक्षित उपस्थित होते.

कोळेकर म्हणाल्या, ‘मुळीकवाडी अंगणवाडीचे कामकाज, स्वच्छता, रंगरगोटी, खेळाचे साहित्य व पोषण आहार याविषयीचे माहिती फलक लक्ष वेधून घेत आहेत.’ यावेळी उपसरपंच गणेश कदम, दीक्षित यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मुळीकवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हिम्मत जगताप, विजय बोबडे, करंजे, रुक्मिणी कदम, तेजस्विनी सावंत, ताई जाधव, छायाताई कदम, कुंभार उपस्थित होत्या. तेजस्विनी सावंत यांनी स्वागत केले.