मानधनातील पैशातून साहित्यांचे वाटप

By Admin | Updated: July 19, 2015 23:37 IST2015-07-19T22:45:04+5:302015-07-19T23:37:30+5:30

मसूर : ग्रामपंचायत सदस्यांची सामाजिक बांधिलकी

Allotment of material from money laundering | मानधनातील पैशातून साहित्यांचे वाटप

मानधनातील पैशातून साहित्यांचे वाटप

मसूर : ‘मसूर येथील ग्रामपंचायत सदस्या वनिता बर्गे यांनी आपल्या मानधनातील पैशातून मसूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीची इतरांनी प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांनी केले.मसूर, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेत दिवंगत आनंदराव चव्हाण, प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वनिता बर्गे यांनी आपल्या मानधनातून केलेल्या शालेय साहित्यवाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक दिलीप सावंत, जनार्दन जाधव, मसूर बिटच्या केंद्रप्रमुख शकुंतला साळुंखे, प्रा. कादर पिरजादे, ग्रामपंचायत सदस्य फैजल मोमीन, भाऊसाहेब बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. जगदाळे म्हणाले, ‘दिवंगत चव्हाण दाम्पत्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ ठसा उमटविला होता.
काँग्रेस पक्षावर त्यांनी अखेरपर्यंत निष्ठा ठेवली व समाजातील दीनदुबळ्या गरीब गरजूंना सतत मदतीचा हात देणे हा त्यांचा भाव होता. या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन वनिता बर्गे यांनी केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.’
कार्यक्रमास माधुरी शेटे, हेमा देसाई, माया सावंत, वर्षा म्हस्के, छाया कुंभार,शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. रमेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. राजकुंवर बर्गे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Allotment of material from money laundering