शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन; राज्यातील संगणक परिचालकाच्या साताऱ्यातील आंदोलनाला १८ व्या दिवशी ब्रेक

By नितीन काळेल | Updated: February 2, 2024 18:43 IST

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे 

सातारा : मानधन नको, वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील संगणक परिचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर १८ व्या दिवशी साताऱ्यातील आंदोलन मागे घेतले. तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनीही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. आता मागण्या मान्य झाल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारपासून सर्वजण कामावर हजर होणार आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आणि राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेसमोर दि. १६ जानेवारीपासून आंदोलन सुरू झाले होते. यामध्ये राज्यातील शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा.कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनी उपोषण सुरू केलेले.दरम्यान, गुरुवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी मानधनवाढ आणि संबंधित कंपनी बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे साताऱ्यातील राज्यव्यापी आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. तसेच अध्यक्षा सुनीता आमटे यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून साताऱ्यात; महिलांचा सहभाग अधिक..साताऱ्यातील संगणक परिचालकांचे हे आंदोलन राज्यव्यापी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणात अधिक करुन महिला संगणक परिचालकांचा समावेश असल्याचे दिसून आले. आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धारच परिचालकांनी केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास होता. त्यामुळे मुंबईत त्यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटले. त्यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवून शब्द दिला आहे. त्यामुळे आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मागण्या मान्य केल्याने मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलनस्थळी येणार नाही असा शब्द दिलेला. मागण्या मान्य झाल्यानंतरच दोघेही आंदोलनस्थळी आले व आपला शब्द पाळला. त्यांचेही आभारी आहोत. आता सोमवारपासून आम्ही कामावर जाणार आहे. - सुनीता आमटे, राज्यध्यक्षा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन