शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाची धावाधाव; रुग्णसंख्येला अटकाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांवर गेली असली तरी सध्या केवळ ३३६ रुग्ण असून, यापैकी १३५ ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांवर गेली असली तरी सध्या केवळ ३३६ रुग्ण असून, यापैकी १३५ रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर गेल्या चार दिवसांत रुग्णसंख्या ३० पेक्षा कमी आल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. मात्र, यासाठी प्रत्येक गावात काटेकोर नियोजन करुन कोरोनावर शेवटचा घाव घालण्याची गरज आहे.

खंडाळा तालुक्यात झपाट्याने वाढत गेलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले आहेत. प्रत्येक गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी यासाठी गावोगावी उपाययोजना केल्या. विशेषत: खंडाळा व लोणंद नगरपंचायत क्षेत्रासह शिरवळमध्ये प्रशासनाने नियम काटेकोरपणे राबवून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे.

खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले आहेत. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १०२४१ पर्यंत पोहोचली आहे. सध्या कोरोनाबाधितांपैकी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १५६, लोणंद केंद्रांअंतर्गत ११२ तर अहिरे केंद्र अंतर्गत ६८ बाधित आहेत. यापैकी केवळ १३५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, तर इतर विलगीकरण कक्षात आहेत. गेल्या चार दिवसांत बाधित संख्या ३० पेक्षा कमी आली असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

चौकट :

लसीचा पुरवठा आवश्यक...

तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालय, शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर उपकेंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. तालुक्यात १८ वर्षांवरील एकूण १ लाख ९ हजार ६१२ जण लसीकरणासाठी पात्र आहेत. तसेच १८ ते ४४ वयोगटातील ६०४७५ लोकांपैकी ३००७ जणांचा लसीचा पहिला डोस झाला आहे. तर ४५ वर्षांपुढील ४९१३७ लोकांपैकी ३३२८५ जणांना लसीकरणाचा पहिला डोस मिळालाय. तर यापैकी केवळ ६६३८ जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. मात्र, लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करुन प्रत्येक गावी शिबिर घेतल्यास कोरोनाचा धोका आणखी कमी होऊ शकतो.

फोटो दि.१६ खंडाळा कोरोना नावाने...

फोटो ओळ : खंडाळा तालुक्यात तयार करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाची पाहणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. (छाया : दशरथ ननावरे)

..............................................................