शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

टपाल कार्यालयात नोकरीसाठी जोडले दहावीचे बनावट प्रमाणपत्र, ..अन् असे फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:17 IST

'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी निवड झाली, सातार्‍यातील डाक विभागामध्ये आला. अन्...

सातारा : 'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी एकाने दहावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून हे प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड केले. हा प्रकार डाक विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित उमेदवारावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.शिवाजी नवनाथ गंडमळे (रा. मांजरी, पो.सुगाव (कॅम्प), ता. मुखेड मांजरी, जि. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्‍या वर्षी भारतीय डाक विभागाकडून 'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्‍यानुसार राज्यभरातून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. अर्जासोबत शैक्षणिक कागपत्रे अपलोड करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया मे २०२२ पासून सुरू होती. या भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असताना संशयित शिवाजी गंडमळे याचे दहावीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले.

तो दहावी उत्तीर्ण आहे. मात्र कमी मार्कस् असल्यामुळे त्याने बनावट मार्कस् दाखवून प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र त्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचे सेंकडरी स्‍कूल २०१६ चे प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड केले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याची या पदासाठी निवडही झाली होती.

या पदासाठी तो पात्र झाल्यानंतर तो स्वत: सातार्‍यातील डाक विभागामध्ये आला. त्याने पुन्हा हे बोगस प्रमाणपत्र आणून दिले होते. त्याची पुन्‍हा तपासणी अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी खरोखरच ते प्रमाणपत्र बनावट असल्‍याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर डाक विभागातील अधिकारी संदीप सोपानराव घोडके (वय ४०, रा. सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास हवालदार राहुल दळवी हे करीत आहेत.

असे फुटले बिंग...'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी ज्या जागेवर उमेदवार नियुक्त करायचे असतात. त्या जागेसाठी जे अर्ज येतील त्या अर्जाची छाननी करून दहावीमध्ये ज्याला जास्त मार्कस् असतात. अशा पात्र उमेदवाराची ऑनलाइन पोर्टलनुसार नियुक्ती होते. व त्यानंतर त्याच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाते. याच पडताळणीमध्ये संशयित शिवाजी गंडमळेचे बिंग फुटले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी