शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

सध्या शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, बाधितांचा आकडा वाढत आहे. तरीही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. ...

सध्या शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, बाधितांचा आकडा वाढत आहे. तरीही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. नियमांची पायमल्ली करीत कोरोना प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. तालुक्यातून अनेक लोक शहरात वेगवेगळ्या कामासाठी येत असतात. त्यामुळे मलकापूर भागात गर्दी वाढत आहे. यातील बरेचजण विनामास्क असतात. यावर शनिवारी पालिकेच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला. डी मार्ट, सिग्नेचर वाईन शॉप, शिंदे लिकर्स या मोठ्या व्यावसायिकांसह अन्य १२ दुकानांवर दंडाची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला.

ढेबेवाडी फाटा येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. शहरातील मुख्य रस्ता, मलकापूर फाटा, कृष्णा रुग्णालय परिसर, ढेबेवाडी फाटा ते आगाशिवनगर परिसरात नागरिकांवर व दुकानात गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली. शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत ही विशेष मोहीम सुरू होती. या मोहिमेत मुख्याधिकारी मर्ढेकर यांच्यासह ज्ञानदेव साळुंखे, रामचंद्र शिंदे, राजेश काळे, उमेश खंडाळे, रमेश बागल, अधिकराव कदम, मनोहर पालकर, शशिकांत पवार, रामदास तडाखे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला होता.

- चौकट

दुसऱ्यांदा सापडल्यास दुकाने सील

मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी स्वत: व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून शनिवारी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर व दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. यावेळी दुसऱ्यांदा सापडल्यास दुकाने सील करण्याची समजही संबंधित व्यवसायिकांना मर्ढेकर यांनी दिली.

फोटो : ०४केआरडी०५

कॅप्शन : मलकापुरात पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांसह दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. (छाया : माणिक डोंगरे)