शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

बटाटा बियाण्याचे व्यापारी एकवटले

By admin | Updated: November 28, 2014 23:53 IST

आरोप बिनबुडाचे : पुसेगाव बाजारपेठेला बदनाम करणाऱ्यांविरुद्ध दावा ठोकणार

पुसेगाव: पश्चिम महाराष्ट्रातील खेड-मंचरनंतर बटाटा बियाणे खरेदी व विक्रीसाठी पुुसेगाव बाजारपेठेचे नाव राज्यात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी बियाण्याबाबत हेतुपुरस्सर केलेल्या आरोपांमुळे बाजारपेठेचे नाव बदनाम होणार असल्याने व्यापारी संघटनेच्या झेंड्याखाली गावातील व्यापारी एकवटले आहेत.
पुसेगावच्या बाजारपेठेत सांगली, खानापूर विटा, तासगाव, आटपाडे, सांगोला, अकलूज, फलटण तसेच सातारा व कोरेगाव भागातील शेतकरी विश्वासाने बटाटा बियाणे खरेदी करण्यासाठी येतात. परंतु
दरम्यान, ‘मी स्वत: शेतकरी कुटुंबातील आहे. मला शेतकऱ्यांविषयी कळवळा व सहानुभूती असून, माझ्याकडे शेतीमाल खरेदी-विक्रीचा परवानाही नाही. पुसेगावसारख्या नावाजलेल्या बाजारपेठेत मी कुणालाही बटाट्याचे बोगस बियाणे विकलेले नाही. केवळ पूर्वग्रहदूषित वृत्तीने मला व बाजारपेठेला बदनाम करण्याचा हा कुटील डाव काही शेतकऱ्यांनी रचला आहे,’ असे जाधव ट्रेडिंग कंपनीचे मालक वैभव जाधव यांनी म्हटले आहे. ‘संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार माझ्याकडून बटाटा बियाणे खरेदी केले असल्यास ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे; अन्यथा मला व पुसेगाव बाजारपेठेला बदनाम करणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुसेगाव, ता. खटाव येथील बटाटा बाजारपेठेतून खरीप हंगामात बटाट्याचे बोगस बियाणे विकल्याची तक्रार काटकरवाडी येथील वसंतराव निकम यांनी यांनी पंचायत समितीकडे केली होती. त्यानुसार बुधवारी (दि. २६) संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने निकम यांच्या शेतात बटाटा झाडे उपटून पाहणी केली व बियाणे बोगस असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्यांचा व आपला काहीही संबंंध नसून, त्यांनी आपल्याकडून बटाटा बियाणे खरेदी केलेलेच नाही, असा दावा वैभव जाधव यांनी केला आहे. (प्रतिनिधी)


खराब हवामानाचा फटका
यावर्षी बटाटा पिकाला पोषक हवामान असले तरी या भागात पडणाऱ्या सततच्या पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी कित्येक दिवस वाहत होते. त्यामुळे खराब हवामान, पाऊस याचा फटका बटाटा पिकाला बसला आहे. केवळ एखाद्याला नजरेसमोर ठेवून बेताल आरोप केल्याने जिल्ह्यासह इतर भागातील शेतकऱ्यांचा पुसेगाव बाजारपेठेवरचा विश्वास उडणार आहे. केवळ द्वेषापोटी एखाद्याला नाहक बदनाम करण्याचा हा प्रकार थांबणे गरजेचे आहे, असे बियाण्यांचे व्यापारी संतोष तारळकर यांनी म्हटले आहे.


पुसेगाव बाजारपेठेतून बोगस बटाटा बियाणे विकले गेल्याच्या आरोपामुळे बाजारपेठेचे नाव बदनाम होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी गावातील व्यापारी संघटना वैभव जाधव यांच्या पाठीशी आहे.
- प्रकाश नांगरे,
बटाटा बियाणे व्यापारी