शर्यतीत बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू, साताऱ्यातील नागठाणे येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 05:33 PM2023-06-09T17:33:54+5:302023-06-09T17:34:16+5:30

नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत गाडीची धडक बसून गाडीचे चाक अंगावरून गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू ...

A youth died after the wheel of a bullock cart ran off him in a race, an incident at Nagthane in Satara | शर्यतीत बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू, साताऱ्यातील नागठाणे येथील घटना 

शर्यतीत बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू, साताऱ्यातील नागठाणे येथील घटना 

googlenewsNext

नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत गाडीची धडक बसून गाडीचे चाक अंगावरून गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झाला. बिरेंदर सिंग (वय ३२, सध्या रा. बोरगाव, ता. सातारा मूळ रा. पंजाब) असे त्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ११ वाजता नागठाणे येथील यात्रेच्या माळावर जय हनुमान तालीम संघ नागठाणे यांच्या वतीने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळपास २५० गाड्या सहभागी झाल्या होत्या. प्रेक्षकांचीही संख्या लक्षणीय होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिरेंदर सिंग हा तरुण उपांत्य फेरीच्या शर्यतीदरम्यान सीमारेषेजवळ उभा होता.

यावेळी अतिवेगाने आलेल्या बैलगाडीची सिंग यांच्या तोंडास जोराची धडक बसली, ही धडक इतकी भीषण होती की, सिंग हा त्याच ठिकाणी कोसळला. त्याचवेळी गाडीचे छकड्याचे चाक त्याच्या तोंडावरून गेल्यामुळे सिंग याचा जबडा फाटला. घटनेचे गांभीर्य ओळखून आयोजकांनी रुग्णवाहिकेतून सिंग यास नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागठाणे सासपडे रस्त्याची विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून दिली. रात्री उशिरापर्यंत बोरगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम चालू होते. अधिक तपास बिट अंमलदार हवालदार हणमंत सावंत करीत आहेत.

Web Title: A youth died after the wheel of a bullock cart ran off him in a race, an incident at Nagthane in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.