सातारा: विवस्त्रअवस्थेत धावताना ट्रकखाली सापडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी ट्रकचालकाला घेतले ताब्यात

By दत्ता यादव | Updated: November 3, 2022 17:24 IST2022-11-03T17:24:06+5:302022-11-03T17:24:32+5:30

तो विवस्त्र कसा झाला, त्याची कपडे कुठे आहेत, हे अद्याप समोर आले नसून शाहूपुरी पोलीस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत.

A young man died after being found under a truck while running naked in Satara | सातारा: विवस्त्रअवस्थेत धावताना ट्रकखाली सापडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी ट्रकचालकाला घेतले ताब्यात

सातारा: विवस्त्रअवस्थेत धावताना ट्रकखाली सापडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी ट्रकचालकाला घेतले ताब्यात

सातारा : विवस्त्रअवस्थेत महामार्गावरून धावताना एका तरूणाचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. प्रवीण संपत भोसले (वय ३०, रा. खर्शी, ता. जावळी) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) वाढे फाटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण भोसले हा रात्री दुचाकीवरून वाढे फाट्याकडे गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत लुटमार झाली की अन्य कोणता प्रकार घडला, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, तो अचानक विवस्त्रअवस्थेत महामार्ग ओलांडून धावत होता.

दरम्यान, कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या ट्रकखाली सापडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस आणि सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ट्रकचालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु प्रवीण भोसले हा धावत येत असताना ट्रकखाली सापडला, असा जबाबही ट्रक चालकाने पोलिसांकडे दिला आहे. तो विवस्त्र कसा झाला, त्याची कपडे कुठे आहेत, हे अद्याप समोर आले नसून शाहूपुरी पोलीस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत. 

Web Title: A young man died after being found under a truck while running naked in Satara