Satara Crime: ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून, भोसे येथील घटना; खुनानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:22 IST2026-01-21T14:21:55+5:302026-01-21T14:22:24+5:30

बीड जिल्ह्यातील नेतेमंडळींचा कारखान्यावर ठिय्या

A sugarcane worker was murdered in Bhose village in Koregaon taluka satara his feet tied and then crushed with a stone | Satara Crime: ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून, भोसे येथील घटना; खुनानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Satara Crime: ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून, भोसे येथील घटना; खुनानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमधील स्लीप बाॅय म्हणून काम करणाऱ्या युवकावर कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा खून कोणत्या कारणातून झाला, हे मात्र अद्याप समोर आले नाही.

मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४२, रा. उखळवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या ऊसतोड मजुराचे तर अजय राजेंद्र माने (रा. भोसे, ता. कोरेगाव, सातारा) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, मच्छिंद्र भोसले हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून ऊस हंगामासाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते.

यंदाही ते पत्नी व कुटुंबासह चिमणगाव (ता. कोरेगाव) परिसरात वास्तव्यास आले होते. १५ जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जात असल्याचे सांगून स्लीप बॉय अजय माने याने त्यांना आपल्या शेतात नेले. तेथे पाय बांधून त्यांचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात टाकून दिला.

दरम्यान, मच्छिंद्र भोसले घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने १७ जानेवारी रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता तेथे छिन्नविछिन्न अवस्थेत मच्छिंद्र भोसले यांचा मृतदेह आढळून आला. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

भोसले यांच्या पत्नीकडे पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर अजय माने याच्यासोबत पती गेले होते, असे सांगितले. पोलिसांनी तातडीने माने याच्याकडे रुग्णालयात जाऊन चाैकशी करून या प्रकरणाचा उलगडा केला. मात्र, आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले हे पुढील तपास करत आहेत.

जरंडेश्वर कारखान्यासमोर पोलिस बंदोबस्त...

या घटनेची माहिती कारखाना परिसरात तसेच बीड जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थ कोरेगावकडे रवाना झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी जरंडेश्वर शुगर मिल परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

खुनानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

खून केल्यानंतर आरोपी अजय माने याने भीतीपोटी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांना खुनाबाबत कोणतीही माहिती नव्हती.

बीड जिल्ह्यातील नेतेमंडळींचा कारखान्यावर ठिय्या

ऊस तोडणी कामगाराचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यातून विविध पक्षांचे नेते आणि ऊस तोडणी कामगारांचे नेते कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन गव्हाणनजीक ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांनी गुन्ह्याबाबत माहिती देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील, या खुनात जे-जे सहभागी असतील त्यांना गुन्ह्यात समाविष्ट केले जाईल,’ असा शब्द हुले यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी मृतदेह बीड जिल्ह्यात नेऊन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.

Web Title : सतारा: गन्ना मजदूर की हत्या, पत्थरों से कुचला शव, आरोपी ने आत्महत्या का प्रयास।

Web Summary : सतारा में एक गन्ना मजदूर की बेरहमी से हत्या कर दी गई; पत्थरों से शव को कुचल दिया गया। आरोपी, एक मिल कर्मचारी, ने बाद में आत्महत्या का प्रयास किया। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Satara: Sugarcane worker murdered, body crushed with stones, accused attempts suicide.

Web Summary : In Satara, a sugarcane worker was brutally murdered; his body crushed with stones. The accused, a mill worker, attempted suicide after. Police are investigating the motive.