Satara: मलकापुरात भरधाव कार भाजी मंडईत घुसली; भाजीविक्रेत्या महिलांना चिरडले, एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:52 IST2026-03-26T12:52:19+5:302026-03-26T12:52:40+5:30

तेरा वर्षांच्या मुलीसह दोन महिला गंभीर, भाजी मंडईत भीषण अपघात

A speeding car entered a vegetable market in Malkapur Satara crushed women vegetable sellers | Satara: मलकापुरात भरधाव कार भाजी मंडईत घुसली; भाजीविक्रेत्या महिलांना चिरडले, एक ठार

Satara: मलकापुरात भरधाव कार भाजी मंडईत घुसली; भाजीविक्रेत्या महिलांना चिरडले, एक ठार

मलकापूर (जि.सातारा) : येथील भाजी मंडईत भरधाव कार घुसली. या अपघातात भाजीविक्री करण्यासाठी रस्त्याकडेला बसलेल्या चार महिलांना कारने चिरडले. या अपघातात उषा बाळू रौंदाळे (वय ४७, रा. मलकापूर, कराड) ही महिला ठार, तर तेरा वर्षांच्या मुलीसह इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

मलकापूर-जखिणवाडी रस्त्याकडेला भरलेल्या भाजी मंडईत बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर भरधाव कार कठड्यावर जाऊन अडकली.

रूपाली मारुती पाटील (३७, रा. काले), दीपाली सचिन हुलवान (३८), ज्ञानदा सचिन हुलवान (१३, सध्या मलकापूर, मूळगाव येडेमच्छिंद्र) अशी जखमींची नावे आहेत.

कोयना वसाहत येथे रस्त्यावरच भाजी मंडई भरते. बुधवारी सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान भरधाव वेगात महामार्गाच्या दिशेने निघालेल्या (एमएच ५०-३००१) या कारचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला भाजी विकण्यासाठी बसलेल्या महिलांमध्ये घुसली. या अपघातात भाजीविक्रेत्या चार महिलांना या कारने चिरडले. 

या अपघातात चिरडलेल्या चारही महिलांना येथील भाजीविक्रेत्यांनी तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले असता एका महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर तेरा वर्षांच्या मुलीसह दोन महिलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ही कार रस्त्यालगत असणाऱ्या फलकाला धडक देत कठड्यावर जाऊन अडकली. संबंधित कार एक महिला चालवत होती, असे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.

Web Title : सतारा: मलकापुर में कार बाजार में घुसी, एक की मौत, अन्य घायल।

Web Summary : सतारा के मलकापुर में एक तेज रफ्तार कार सब्जी मंडी में घुस गई, जिससे एक महिला की मौत हो गई और 13 साल की एक लड़की सहित तीन अन्य गंभीर रूप से घायल हो गए। कार सड़क के किनारे सब्जी बेच रही चार महिलाओं से टकरा गई। घायलों का कृष्णा अस्पताल में इलाज चल रहा है।

Web Title : Satara: Car crashes into market, killing one, injuring others.

Web Summary : A speeding car crashed into a vegetable market in Malkapur, Satara, killing a woman and seriously injuring three others, including a 13-year-old girl. The car hit four women selling vegetables by the roadside. The injured are receiving treatment at Krishna Hospital.